City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha
दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्य़यात्रेला सुरूवात...पावणे बाराच्या सुमारास निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार, राष्ट्रपती,पंतप्रधान उपस्थित राहणार..
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा....मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तर मस्साजोग गाव बंद
संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार ३ आरोपींचा खून, अंजली दमानियांचा आरोप, आपल्याला फोन आला असून माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्याचा दावा
ठरवलं तर पाच मिनिटात वाल्मिक कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाट, संभाजीराजे छत्रपतींचा आरोप, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा..
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित, शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
भाजपचं शिर्डीमध्ये १२ जानेवारीला महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार, १० हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रण...
मुंबईतील साकीनाका परिसरातील दोन गोदामांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न