City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 31 जुलै 2024 : ABP Majha

Continues below advertisement

उरणमधील यशश्री शिंदेंची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर  

राज्य महिला आयोगाकडून यशश्री शिंदे हत्याकांडाची दखल, उरण पोलिसांकडून मागवला अहवाल, तपास प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश.  

मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यातला आरोपी कर्णबाळा दुनबळे मुंबईत असल्याची माहिती, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु.  

अकोल्यातील तोडफोड प्रकरणातील 3 आरोपी अटकेत,  पंकज साबळे,सौरभ भगतपाठोपाठ दीपक बोडखेही ताब्यात, तर मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे फरार.   

अमोल मिटकरींच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ.  

मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार, जय मालोकार यांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप.  

मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला, हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप. 

लोकशाहीत मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ला ही घटना निषेधार्थ आहे, अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्यावर रवी राणांची प्रतिक्रिया.  

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram