City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 31 Aug 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 31 Aug 2024 : ABP Majha
महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच भाजपची १५० पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका, जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाने ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य.
राष्ट्रवादी महायुतीत६० हून अधिक जागा घेण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे ५४ आमदार, काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य,.
पहिल्या टप्प्यात जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार, आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हाच जागावाटपाचा निकष, अजित पवारांकडून स्पष्ट.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघात, कटोलच्या जागेसाठी अजित पवार आग्रही, त्यामुळे मतदारसंघाचाही दादांकडून आढावा.
राष्ट्रवादी बरोबर दुर्देवी युती, असंगाशी संग केला, भाजप प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य, लोकसभेत राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप.