What is CAA ? : Citizenship Amendment Act म्हणजे नेमकं काय? कायदा लागू झाल्यास काय होणार?

Continues below advertisement

Citizenship Amendment Act : नागरिकत्व (सुधारणा) कायद्याबाबत (Citizenship Amendment Act) देशात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याआधीही या कायद्याबाबत बरीच चर्चा झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. हा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. काही काळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, हा देशाचा कायदा (Citizenship Amendment Act) आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत लागू केला जाईल. केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनीही आज सोमवारी (29 जानेवारी) पश्चिम बंगालमध्ये CAA एका आठवड्यात लागू केला जाईल असा दावा केला आहे. याची अंमलबजावणी केवळ पश्चिम बंगालमध्ये होणार नाही, तर संपूर्ण देशात लागू केली जाईल. हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर अधिक आक्षेप नोंदवले आणि कठोर भूमिकाही दिसून आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram