Vaccination : राज्यात 1 कोटी 26 लाख नागरिकांचं लसीकरण अद्याप बाकी : Abp Majha
abp majha web team
Updated at:
20 Dec 2021 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिसेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचं लक्ष ठेवणाऱ्या महाराष्ट्राचं स्वप्न भंगणार असंच दिसतंय कारण राज्यात अद्यापही 14 टक्के नागरिकांनी म्हणजेच 1 कोटी 26 लाख जणांनी अद्याप कोरोनाची एकही लस घेतली नाहीये. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी अवघ्या 4 जिल्ह्यात हे लक्ष्य गाठलं जाणार आहे. पुणे आणि मुंबईत100 टक्के पहिला डोस देऊन झाला आहे. तर भंडारा आणि सिंधुदुर्गात 100टक्के लसीकरणाचं लक्ष्य दृष्टीक्षेपात आहे.