New Year Kokan : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची कोकणाला पसंती तर हॉटेल्सकडून ऑफर्सचा वर्षाव
Continues below advertisement
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील पर्यटनस्थळ सज्ज झाली आहेत. कोकणातील समुद्रकिनारी तसेच विविध पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्री पर्यटकांची गर्दी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग, तळाशील, शिरोडा समुद्रकिनारी पर्यटकांची तौबा गर्दी झाली आहे. देशविदेशी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यावर समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. कोकणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यातही कोकणातील समुद्रकिनारी डॉल्फिन सफर, कांदळवन सफर आणि विदेशी पक्षांची नजरेची पारणं फेडणारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
Continues below advertisement