CIDCO Land Scam 1400 कोटींची फसवणूक,Rohit Pawar यांचा आरोप खरा,वन विभागाचा अहवाल ABP माझाच्या हाती

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Sharad Pawar गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडको जमीन घोटाळ्याचा (CIDCO Land Scam) केलेला आरोप वन विभागाच्या चौकशी अहवालामुळे खरा ठरण्याची शक्यता आहे. 'यशवंत बिवलकर (Yashwant Bivalkar) यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं' वन विभागाच्या (Forest Department) चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या विशेष अहवालानुसार, उरण आणि रसायनी परिसरातील वनविभागाची सुमारे ६१,७५० चौरस मीटर जमीन सिडको (CIDCO) आणि नगरविकास खात्याच्या संगनमताने बिवलकर यांना देण्यात आली. या प्रकरणी वन विभागाने उरण आणि पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी, अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सिडको आणि नगरविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola