Chitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणा
Chitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणा
महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी काल (रविवार,15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. यात यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे पाचव्यादा आमदार म्हणून निवडून आलेले संजय राठोड यांनीही आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले होते. अशातच संजय राठोड यांना माझा विरोध कायम राहील, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी पुन्हा एकदा घेतला आहे.
मुळात उद्धव ठाकरे यांना मी प्रश्न विचारते की त्यांनी संजय राठोड यांना क्लीनचीट का दिली? राठोड यांना जरी मंत्रीपद दिले असलं तरी माझा विरोध हा कायम राहणार आहे, असे म्हणत संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आमदार चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्यानेत्या सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत हल्ला चढवला आहे. महिलांसंदर्भात वादग्रस्त ठरलेल्या संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली आहे. संजय राठोडला मंत्रिपदाची शपथ घेताना पाहून पूजा चव्हाणच्या आत्म्याला काय वाटत असेल? असा सवालही त्यांनी केला आहे. तर दुटप्पी, हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं, असे म्हणत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांवर हल्ला चढवला आहे.