Rupali Chakankar on Chitra Wagh : चित्रा वाघ बालिशपणा करतायेत, चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार?
उर्फी जावेद हिच्या कपड्यावरुन सुरु झालेला वाद अजूनही थांबत नाहीय.. राज्य महिला आयोगाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे.. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते.. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आवाहन करण्यात आलंय.. तसंच रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केलाय..