Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे
Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे
भाजपने नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात शिंदेंचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली होतीय. संजय राठोड सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या अनेकदा या मुद्द्यावर पंचाईत झाली होतीय. चित्रा वाघ आज अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्याय. त्यावेळी संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का?, असा प्रश्न विचारल्यानंतर पक्षाने जिथे सांगितले तिथे प्रचाराला जाणार असल्याचं वाघ म्हणाल्यात. दरम्यान, त्यांनी फाईलच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेले आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. महासंसदरत्न असलेल्या सुप्रिया सुळे अशा आधारहीन कशा बोलू शकतात?, असा प्रश्न त्यांनी केलाय. दरम्यान बॅग तपासणीच्या मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. बॅग तपासतांना उद्धव ठाकरे यानी काढलेल्या व्हिडिओतील भाषा पाहिल्यानंतर ते त्रागा करीत असल्याचं वाटतंय, असं चित्र वाघ म्हणाल्याय. बॅक तपासणी आणि संजय राठोड यांच्या मुद्द्यावर चित्र वाघ नेमकं काय बोलल्यात पाहुयात. बाईट : चित्रा वाघ, भाजपा नेत्या आणि आमदार. चित्रा वाघ ऑन बॅग तपासणी : # देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही बॅग तपासल्या जातात. # त्यांनी कधी या मुद्द्याचं राजकारण केलं नाही. # मात्र उद्धव ठाकरे आणि विरोधक जाणीवपूर्वक या मुद्द्याचे राजकारण करीत आहेत. चित्रा वाघ ऑन संजय राठोड प्रचार : # मी प्रचारासाठी राज्यभर फिरत आहे. पक्षाने जिथे सांगितलं तेथे प्रचाराला जाईल. # मी पक्षासाठी सातत्याने राज्यभर फिरत आहे.