Chiplun : नवीन लाल आणि निळ्या पुररेषेसंदर्भात 2000 चिपळूणकरांच्या हरकती ABP Majha
२२ जुलै रोजी आलेल्या महापुराचा चिपळूणला फटका चिपळूण शहराला बसला..त्यानंतर अनेक पुर कश्यामुळे आला त्यावर आरोप प्रत्यारोप झाले..काही दिवसानंतर पाटबंधारे विभागाने वाशिष्टीनदी पात्राचा सर्वे करुन शहरात नदीपात्राजवळील जागेत लाल आणि निळी पुररेषा मारण्यात आली..त्यात शहर ९० टक्के बाधीत दाखवले आहे..त्यामुळे या पुररेषेत येणाऱ्या विभागात नवीन बांधकाम परवांगी देण्यास नकार देण्यात आला आहे..अनेकांची घरे या पुररेषेत आल्याने चिपळूणकरांनी यावर आक्षेप घेतला आहे.. यावर आज २००० रहिवाशांनी हरकती मुख्याधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत..