Chiplun : महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला : ABP Majha
बराच काळ भिजत घोंगडं असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झालेय. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. कूर्मगतीनं सुरू असलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करत केंद्र सरकारला जाब विचारलाय. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.