Chiplun Konkan Flood : Chiplun च्या महापुराची कारणं शोधण्यासाठी पालिका कोर्टात : ABP Majha
चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे. कारण पुराबाबत चिपळूणपालिका आता महसुल, पाटबंधारे आणि हवामान विभागाविरोधात कोर्टात जाणार आहे. चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 ऑगस्टरोजी झालेल्या सभेत याबाबतचा निर्णय झाल्याचं चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याबाबत तिन्ही विभाग का उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.