Chiplun Flood : चिपळूणमधील पाहणी दौऱ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा संताप, म्हणाले...
चिपळूणमधील पाहणी दौऱ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा संताप पाहायला मिळाला. पूरग्रस्त चिपळूण बाजारपेठेची पाहणी करण्यासाठी नारायण राणे पोहोचले होते. त्यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने राणेंचा पारा चढला. यावेळी राणेंनी संबंधित अधिकाऱ्याची खरडपट्टी काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झालाय.