Chipi Airport | सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला अखेर परवाना मिळाला
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळ ला आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या एसपीव्हीला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (डीजीसीए) चिपी विमानतळासाठी चालन परवाना प्राप्त झाला आहे. या एरोड्रोम लायसेन्समुळे आता चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल. आयआरबी इन्फ्रा च्या एसपीव्ही कंपनीने विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड एयरपोर्ट प्रकल्प आहे. कोकण संपूर्ण देशासोबत जोडले जाण्यासाठी चिपी विमानतळ खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा प्रकल्प कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणि स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Continues below advertisement