सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा ठरणारी 'ती' चिमणी अखेर पाडणार? अडथळा आणणाऱ्या चिमणीचं काय करायचं?
सोलापूर विमानतळापासून जवळ असलेल्या सिध्देश्वर साखर कारखान्याची कोजनरेशन चिमणी ही विमानसेवेत अडथळा ठरेल असा अहवाल देण्यात आल्याने DGCA ने परवानगी नाकारली. प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, चिमणी पाडण्याचे आदेश देण्यात आले मात्र कोणतं ना कोणतं कारण सांगून हे काम आतापर्यंत तसंच रखडलेलंच आहे.