Childrens Day 2021 : Gondia : बालदिनानिमित्त तीन चिमुकल्याचं बोलकं चित्र ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Nov 2021 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंची जयंती.. त्यांचं मुलांविषयी प्रेम पाहता आज देशभर बालदिन साजरा केला जातो. बालदिनाचं औचित्य साधून गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार सोनू फुलसुंगे या तरुणीनं सुंदर रांगोळी साकारली. बालपणाचा आनंद घ्या या थीमवर सोनूनं तीन चिमुकल्या मुलांचं बोलकं चित्र रांगोळीतून साकारलंय. त्यासाठी तिने गांधींच्या वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, या त्रिसूत्रीचा आधार घेतला. या रांगोळीसाठी सोनूना ७ किलो रांगोळी आणि ६ तासांचा वेळ लागलाय.