Children Vaccination : १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ

Continues below advertisement

 एकीकडे चीन, दक्षिण कोरिया या देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केलेय. तर दुसरीकडे युरोपातल्या काही देशात डेल्टाक्रॉन हा नव्हा व्हेरियंट सापडलाय. कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना देशातल्या छोट्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. आजपासून १२ ते १४ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. मुलांना कोर्बेव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतरानं देण्यात येणार आहेत. मुंबईत १२ केंद्रांवर आज दुपारी १२ वाजल्यापासून हे लसीकरण सुरू होणार आहे. यंदा जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरू झालं. आणि आता यापुढील टप्पा म्हणजे १२ ते १४ वयोगटाच्या मुलांनाही लस कवच मिळणार आहे. मुलांप्रमाणे आजी आजोबांसाठीही खूशखबर आहे. आजपासून ६० वर्षावरल सर्व ज्येष्ठांना कोरोनाचा तिसरा डोस घेता येणार आहे. आत्तापर्यंत फक्त कोमॉर्बिड ज्येष्ठांना तिसरा डोस मिळत होता मात्र आता सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येणार आहे. कोरोना प्रतिबंधक मोहिमेचा हा पुढचा टप्पा आजपासून सुरू होतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram