Child Pornography | बीड चाईल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड, दोन लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हीडिओ वेबसाईटवर अपलोड | ABP Majha

बीड जिल्ह्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दोन लहान मुलांचे व्हीडिओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेत. हा सगळा गंभीर प्रकार मुंबई सायबर क्राईमच्या निदर्शनास आला. हे व्हीडिओ बीडमधून अपलोड झाल्याची माहिती सायबर क्राईम सेलनं बीड पोलिसांना कळवली. यानंतर परळी, गेवराईमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. यामागं कुठलं रॅकेट आहे का याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येतोय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola