Maharashtra : चिमुकल्यांच्या धाडसाचा कौतुक सोहळा, महाराष्ट्राच्या बालरत्नांना बालशौर्य पुरस्कार
खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्यांनाही लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या बालरत्नांचा पंतप्रधान मोदींनी गौरव केलाय. जळगावची 5 वर्षीय शिवांगी काळे आणि नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन संवाद साधत महाराष्ट्राच्या या बालरत्नांचं कौतुक केलं. शिवांगीची आई आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली असताना तिला गरम पाण्याच्या हीटरचा शॉक लागला.. यावेळी शिवांगीने क्षणाचाही विसंब न करताना वीजेचं बटन बंद केलं. त्यामुळे शिवांगीची आई आणि तिच्या लहान बहिणीचा जीव वाचलाय.. तर नांदेडच्या कंधार तालुक्यातील घोडजमधील कामेश्वरनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या दोघांचा जीव वाचवला होता. तर मुंबईजवळच्या मिरारोडची पृथ्वी पाटील ही तरुणी सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट ठरलीय...19 वर्षांची पृथ्वी सध्या मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून बीएससीचं शिक्षण घेतंय..28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पृथ्वीचा सन्मान केला जाणार आहे.