Child vaccination: देशभर मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ, मुलांच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभर मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय. मुलांच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आलाय. तर कोविन अॅपवर साडेबारा लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केलीय. 2007 किंवा त्याआधी जन्म झालेली मुलं लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन अॅपवर नोंदणी करुन किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करु शकतात. मुलांना सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जातेय.