Child Vaccination : देशभरात 41 लाख मुलांना पहिला डोस, लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Corona Vaccination For Children : महाराष्ट्रासह देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय. पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतलाय. जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहेत. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.