Child Trafficking : एक दोन हजार रुपयांसाठी पोटच्या मुलांची विक्री, अहमदनगर आणि नाशिकमधील घटना
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक दोन हजार रुपयांसाठी पोटच्या मुलांची विक्री करुन या मुलांवर अमानुष अत्याचार करून त्यांच्याकडून विविध प्रकारची कामं करुन घेत असल्याचं समोर आलंय... या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होतोय.