Nanded Hospital : मुख्य सचिवांकडून शासकीय रूग्णालयातील मृत्यू प्रकरणाची दखल : ABP Majha
राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी राज्यातील विविध रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूबाबत आढावा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मुख्य सचिवांनी शासकीय रूग्णालयांमध्ये दिवसाला किती मृत्यू होतात, आणि महिन्याला सरासरी किती मृत्यू होतात याचा आढावा घेतलाय. प्रामुख्याने नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हालयातील रूग्णालयांचा आढावा घेतलाय