Eknath Shinde Gurupournima: मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळास भेट ABP Majha

Continues below advertisement

गुरुवंदनाच्या आजच्या दिवसाला शिवसेनेत खास महत्त्व आहे. त्यातच यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडानंतरची आजची पहिली गुरुपौर्णिमा. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या भेटीची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन वंदन करणार असल्याचं जाहीर केलंय. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदे यांनी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram