Sambhajiraje Chhatrapati Meet CM : मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंची 'सह्याद्री'वर भेट ABP Majha

Continues below advertisement

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळल्याची चर्चा सुरू झाली होती. पण त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. त्यामुळं त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. छत्रपती संभाजीराजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले होते. पण त्यावेळी उभयताची भेट होऊ शकली नाही आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले होते. पण उभयतांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली असून, त्यावेळी मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram