Shinde vs Thackeray SC : Nabam Rebia प्रकरण बाजूला ठेवून या प्रकरणाकडे पाहुला - सरन्यायाधीश

Continues below advertisement

Maharashtra Political Crisis: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सात न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्णय देणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. मंगळवारी या संबंधित ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला. आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार असून आज यावर निर्णय होऊ शकतो. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही?, याबाबत सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केलीय. दरम्यान, या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस राखीव ठेवले आहेत. आज जर या प्रकरणाचा निर्णय झाला नाही तरी उद्या तो होईल असं सांगण्यात येतंय.

 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram