Deepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !
Deepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचे भाऊ दीपक निकाळजे हे देखील निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळत आहेत. आरपीआय आंबेडकर गट या पक्षाच्या माध्यमातून दीपक निकाळजे निवडणूक लढवत असून चेंबूर विधानसभा क्षेत्रातून त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रकाश फातर्फेकर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तुकाराम काते निवडणूक लढणार आहेत या विधानसभा मतदारसंघात तिरंगी निवडणूक पार पडणार असून. यासाठी प्रत्येक उमेदवार घराघरात जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. दीपक निकाळजे यांना देखील रिक्षा हे चिन्ह मिळाला असून त्यांनी विधानसभा मतदारसंघात रिक्षाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे.