ABP News

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषण

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषण

"ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या घरच्या मंडळींना बोललो. त्यावेळी मी निर्णय घेतला की, हा जो म्होरक्या आहे. या म्होरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो. छत्रपती कधी कोट करत नाहीत. म्होरक्याच्या आश्रयदाता असलेल्या धनंजय मुंडेला (Dhananjay Munde) मंत्रिपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. मला माहिती नाही, त्याचा राजीनामा घेतील की हकालपट्टी करतील? मी बीडच्या जनतेला सांगायला आलोय, जर त्याला पालकमंत्रिपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकमंत्रिपद घेणार", असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केलाय. बीड (Beed) येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळावा, यासाठी निघालेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण असल्याने मी मनोज जरांगेंना मी म्हणालो तुम्ही शेवटी बोला. संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा मी महाराष्ट्रात नव्हतो. मी म्हणालो आता महाराष्ट्रात पोहोचणे गरजेचं आहे. मी त्यांच्या घरी गेलो.  विराज संतोष भाऊंचा मुलगा आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या घरच्यांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं, ते मला बघवलं नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? ही दहशत? त्यावर आजही कारवाई होत नाही. है दुर्दैव आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram