Sambhajingar Child Challenged Case: गतिमंद शाळेतील शिपाई दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडेवर गुन्हा दाखल

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत झालेला अमानुष मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिपाई दीपक इंगळे (Deepak Ingale) आणि केअर टेकर प्रदीप देहाडे (Pradeep Dehade) या दोघांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या बातमीच्या इम्पॅक्टनंतर ही कारवाई झाली आहे. यातील एका व्हिडिओमध्ये, 'कुक्करच्या झाकणानं गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधून त्याला मारहाण' करताना दीपक इंगळे दिसत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा विभाग मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या अखत्यारित येत असून, त्यांच्याच जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याने शाळेच्या संस्थाचालकांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola