Chhatrapati Sambhajinagar Gym CCTV : धक्कादायक! जिममध्ये व्यायाम करताना उद्योजकाचा मृत्यू
छत्रपती संभाजी नगर शहरात एका जिम मध्ये व्यायाम करत असताना एका उद्योजकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सीम्रन मोटर चे मालक कवलजीत सिंग बग्गा हे आपल्या काही सहकऱ्यासोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये गेले होते मात्र, व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि त्यांचा काही क्षणातच मृत्यू झालाय. दरम्यान हा मृत्यूचा क्षण जिम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.