Chhatrapati Sambhaji Raje On Manoj Jarange : जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा
Chhatrapati Sambhaji Raje On Manoj Jarange : जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा
मनोज जरांगेंचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो आहे. मला दु:खी वाटतंय, वेदना होत आहेत. कारण त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलंय, तर दुसरीकडे सरकार निवांत मुंबईत एयर कंडीशनर ऑफिसात बसले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना…मग घ्या निर्णय आणि आरक्षणाबाबत हो किंवा नाही ते एकदाचं बोलून टाका.
इथले मेडिकल रिपोर्ट राज्य सरकारकडे जात आहेत. जरांगेंचे मेडिकल रिपोर्ट खूप वाईट आहेत. त्यांना काहीही होऊ शकतं. त्यामुळे जरांगेंना जर काही झालं तर यासाठी राज्य सरकार जबाबदार असणार आहे. तसेच मी पूर्वीही जरांगेंसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही त्यांच्यासोबत असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी त्यांना बोलू शकतो. पण मला त्याचं लक्ष विचलित करायचं नाही. त्यामुळे सरकारला सूचना आहे की, जरांगेंचे मेडिकल रिपोर्ट बघा. त्यांच्या किडन्यांचं फंक्शनिंग, लिवरचं फंक्शनिंग कसं आहे, ते एकदा बघा. जरांगेंचा ब्लड प्रेशर लो झालं आहे. पण याचं जर तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत संभाजीराजे छत्रपती यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.