Sambhaji Nagar Crime : संभाजीनगरमध्ये दृश्यम 2...14 महिन्यांनतर गुन्ह्याचा उलगडा Special Report

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar) अविनाश साळवे खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरात जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पूरला होता. यानंतर क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी घेऊन या जागेत 8 ठिकाणी 12 फूट खोल खड्डे खोदले. 

14 महिन्यांपूर्वी खून करून मारून पुरलेल्या घटनेत अखेर खुनाचा उलगडा

पोलिसांनी खोदलेल्या 12 फूट खोल खड्ड्यांमधून पोलिसांच्या हाती 4 ते 5 मानवी हाडे लागली. 14 महिन्यांपूर्वी खून करून मारून पुरलेल्या घटनेत अखेर खुनाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी अविनाश साळवे यांचा चुलत भाऊ राहुल साळवेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान,. खड्ड्यामध्ये मिळालेले हाडांचे तुकडे फॉरेनसिक विभागाला पाठवून, DNA चाचणीनंतर ते कोणाचे आहेत हे निष्पन्न होईल.

पोलिसांना खड्डे खोदताच काय मिळाले?

पोलिसांनी खड्डे खोदल्यानंतर त्यां खड्यामध्ये केवळ 1 हाड व इतरत्र सहा तुकडे सापडले. अविनाश यांना रात्री मारल्यानंतर राहुल तेथून पसार झाला होता. त्यानंतर सकाळी पुन्हा तो घटनास्थळी गेला होता. त्यामुळे 12 ते 15 कुत्री मृतदेहाचे लचके तोडत होते. राहुलने त्यांना हाकलले, जागेवर केवळ हात, काही बोटे आणि पायाचे तुकडे उरले होते. त्यानंतर उरलेले शरीराचे तुकडे त्याने जलवाहिनीखाली पुरले होते. आता, मिळालेले हाडांचे तुकडे फॉरेन्सिक विभागाला पाठवून डीएनए चाचणीनंतर ते कोणाचे आहेत, हे निष्पन्न होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram