शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याबाबतचा करार संपन्न, नोव्हेंबर 2026 पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणण्याबाबत आज सामंजस्य करार करण्यात आला. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालय आणि महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक खातं यांच्यात हा करार झाला. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः लंडनला गेले आहेत. नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या काळात ही वाघनखं महाराष्ट्रात असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखांच्या सहाय्यानं अफझल खानाचा वध केला होता. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसासाठी या वाघनखांचं महत्त्व अतुलनीय आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram