Chhangur Baba Pakistan Funding | अवैध धर्मांतरासाठी Pakistan मधून पैसा मिळाल्याची कबुली

अवैध धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या छांगुर बाबा उर्फ जलालुद्दीनने पाकिस्तानमधून पैसा मिळाल्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ईडीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान, छांगुर बाबाने त्याच्या बँक खात्यांमध्ये पाकिस्तानसह इतर देशांमधून मदत जमा होत असल्याची कबुली दिली. या कबुलीमुळे अवैध धर्मांतराच्या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय पैलू प्राप्त झाला आहे. छांगुर बाबाने चौकशीत, "धर्माचा प्रचार-प्रसार बेकायदेशीर कसा?" असा उलट सवालही केला आहे. छांगुर बाबा सध्या अटकेत असून, ईडी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. त्याच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांच्या स्त्रोतांचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. अवैध धर्मांतराच्या या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola