Chhagan Bhujbal : मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्ला

Continues below advertisement

Chhagan Bhujbal :  मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्ला

नांदगावमध्ये समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज आणि समीर आता तुम्ही मोठे झाला आहात, आई - वडिलांना मात्र तुम्ही लहानच असतात पण तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला शिका, असा भावनिक वडिलकीचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.  ते म्हणाले,   समीर भाऊ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात काम करायचं आहे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर, पंकज भाऊ आहेत तुमच्या बरोबर आहोत. कल्पक बुद्धीचे आहात, रात्रंदिवस मेहनत करता, नेहमी बॅक स्टेजला असायचे. आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत. माझे त्यांना आशीर्वाद आहेत. नांदगाव करांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यांना लाभो, असं छगन भुजबळ म्हणाले.

 छगन भुजबळ नाशिकच्या नांदगाव येथे समीर भुजबळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अजय - अतुल यांच्या यांच्या साद स्वरांची संगीत मैफिल या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे.जनतेची सेवा करा, समाजकारण करा आणि त्यातून राजकारण करा जनता नेहमी तुमच्या पाठीशी राहील असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram