Chhagan Bhujbal Speech OBC Elgar Morcha : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, स्फोटक भाषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal Speech OBC Elgar Morcha : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, स्फोटक भाषण
पंढरपूर : आज अन्याय करणारे बदलेल आहेत, ज्योतिबांनी जेव्हा शाळा काढण्याचं काम हाती घेतलं त्यांच्यासोबत अनेक ब्राम्हण देखील होते. त्यांना ब्राम्हणांनी मदत केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. असं छगन भुजबळांनी (Chhagan Bhubaj) म्हटलं ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात म्हटलं. पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
पांडुरंग सगळ्यांचा आहे
हा पांडुंरग सगळ्याचा आहे. मी मागच्या वेळी देखील सगळ्या संतांची नावं वाचून दाखवली होती. या सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे. सगळे एकत्र येऊ. निवडणूक आली की सगळ्या पक्षांचे नेते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात. तेव्हा त्यांना अडवलं जात नाही. मग आरक्षणाच्या वेळेसच का अडवलं जातं, असा सवाल भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.