Chhagan Bhujbal : भाजपने 80-90 जागांचा शब्द दिलाय, मिळाल्याच पाहिजेत- भुजबळ आक्रमक!

Continues below advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागावाटप करताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून आले. कारण, महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील 1 जागा रासपच्या महादेव जानकर यांना देऊ केली. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत ही नाराजी उघड झाल्याचं दिसून आलं. मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेला किती जागा हव्यात हेच जाहीरपणे सांगितले. त्यावर, आता उपमुख्यमत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली. 

महायुतीच्या जागावाटपात लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 28 जागा घेतल्या. तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेनं ओढून-ताणून 15 जागांपर्यंत मजल मारली होती. मात्र, जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यावरुन, विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. तर, पक्षातील काही नेतेही नाराज झाले होते. आता, छगन भुजबळ यांनी जागावाटपातील आपली नाराजी उघड केली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली. त्यामुळे, लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे. we

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram