Chhagan Bhujbal : आयकर विभागानं कारवाई केलेल्या संपत्तीशी संबंध नाही : छगन भुजबळ ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यानंतर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना आयकर विभागानं दणका दिलाय. छगन भुजबळांची १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केले गेलीय. छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची ही संपत्ती असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विट करुन दिलीय. तर दुसरीकडे या संपत्तीचा माझ्याशी काहाही संबंध नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलंय.
Continues below advertisement