Chhagan Bhujbal : आरक्षण प्रश्नावरून भुजबळांचा शिंदेंना टोला?

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : आरक्षण प्रश्नावरून भुजबळांचा शिंदेंना टोला? राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटेन, राहुल गांधींना (Rahul Gandhi) देखील भेटेन असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी स्पष्ट केलं आहे.   राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत  छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही येणार की छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेलेत? अशी चर्चा दुपारपर्यंत राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात पवारांना भेटलो असं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत.  मात्र, शरद पवारांना मी राजकीय विषयासंदर्भात भेटायला गेलो नव्हतो. राज्यात सध्या मराठा समाज ओबीसी समाजाच्या लोकांकडे जात नाही आणि ओबीसी समाजातील लोक मराठा समाजाच्या लोकांकडे जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे शरद पवारांसोबत या प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram