Chhagan Bhujbal : Maharashtra Sada घोटाळ्यात मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढणार? ABP MAJHA
Continues below advertisement
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे हे अर्ज सादर केले आहेत. या अर्जावर 20 डीसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे निर्देश ईडीला देण्यात आले आहेत. छगन भुजबळांसह इतरांनी या खटल्यातून मुक्त करावं, या मागणीसाठी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र, ही सुनावणी थांबवून आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर आधी निर्णय घ्यावा, अशी विनंती या तिघांनी कोर्टाला केली आहे.
Continues below advertisement