Chhagan Bhujbal Delhi दौऱ्यावर, OBC Reservation संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज दिल्लीत दाखल झालेत. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यासह काही नेत्यांची भुजबळ भेट घेणार आहेत. या आधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं इम्पेरिकल डाटाबाबत केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे आदेश दिले होते. त्यामुळे केंद्र सरकार काय भूमिका मांडणार याकडेही लक्ष लागलं आहे.