Chhagan Bhujbal on Manoj Jarange : अधिकाऱ्यांना जरांगेंकडून शिवीगाळ, भुजबळ सभागृहात आक्रमक
Continues below advertisement
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता काही अंशी निकालात निघाला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर होण्याची चिन्हे आहेत. थोड्याचवेळात मराठा आरक्षणाचे विधेयक (Maratha Reservation Bill) विधानसभा आणि विधानपरिषेदच्या पटलावर ठेवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे गटनेते मराठा आरक्षणासंदर्भाती आपापली भूमिका मांडतील. या चर्चेअंती मराठा आरक्षण विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी मतदान घेतले जाईल. यावेळी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास ते राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Chhagan Bhujbal Obc Reservation OBC 'Eknath Shinde Manoj Jarange 'Maharashtra