Chhagan Bhujbal Full OBC Sabha : राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवलं,भुजबळांचा हल्ला
Chhagan Bhujbal Full OBC Sabha : राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवलं,भुजबळांचा हल्ला
जालना: याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिलं आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. जालन्यामधील आंबड या ठिकाणी आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पहाटे आणून आंदोलनाला बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्यायमूर्तींवर टीका
छगन भुजबळ म्हणाले की, न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे.