Chhagan Bhujbal on Munde : गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? भुजबळांच्या वक्तव्याने खळबळ
Continues below advertisement
राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडमधील एका सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 'आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला... मी धनंजयला म्हणालो अरे... गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्याल,' असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी दुजोरा दिला आहे. 'राजकारणामध्ये पोटाचा वारसा नसून विचारांचा असतो आणि ते धनंजय मुंडे यांनी आज करून दाखवलेलं आहे,' असं म्हणत करुणा शर्मा यांनी भुजबळांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला. आपणही गोपीनाथ मुंडे यांची सून असल्याने आणि त्यांच्या विचारांनी राजकारणात आल्याने त्यांचा वारसा चालवत आहोत, असंही शर्मा म्हणाल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement