Chhagan Bhjabal PC : औरंगजेबाला कोण लाच देऊ शकतो, सोलापुरकरांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Chhagan Bhjabal PC : औरंगजेबाला कोण लाच देऊ शकतो, सोलापुरकरांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेबाबतच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या लोकांना वेड लागलंय का काय लागलंय,हे कोण आहेत. औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात, औरंगजेबाकडे सगळ्या देशाचं राज्य होतं त्याला कोण लाच देऊ शकतं, वाटेल ती विधान सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथील तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळं काम करुन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा तो भाग आहे तिथून ते आग्रा येथून सुटले. तुम्ही म्हणता तसं असतं तर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आरामात आले असते. महाराजांनी संभाजी महाराजांना काशीला सोडून दिलं. एकटे महाराज रायगडावर आले त्यावेळी राजमाता जिजाऊ विचारतात शंभूराजे कुठं आहेत?  यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं, हा इतिहास आहे. इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण, असं छगन भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola