Rain Alert Special Report : पावसाळ्यात समुद्रावर जाण्याआधी हे पहा! ABP Majha
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात ९९ जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.