Chara Chawani Maharashtra : चारा संपला, प्रश्न उभा ठाकला; जनावरांना जगवायचं कसं? Special Report
गेल्यावर्षी वरूणराजाने म्हणावा तसा आशीर्वाद दिला नसल्याने, यंदा महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. पिण्याच्या पाण्याची ओरड असताना, आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये चाऱ्याचा साठा अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे, जनावरांना जगवायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
हे देखील पाहा
Voting issues in Election Mumbai Kalyan : मतदानाची स्लो ट्रेन, आरोपांची एक्सप्रेस! Special Report
ठाणे : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे, ते या निवडणुकीतही पाहायला मिळालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम मध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहेत. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेमध्ये 80 हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसतंय.
आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचे वोटिंग कार्ड त्यांच्याजवल होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.