Pimpri Chinchwad : महापालिका आयुक्त Rajesh Patil यांच्या कार्यालयासमोर गोंधळ, शाई फेकत आंदोलन

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटलांच्या कार्यालयासमोर गोंधळ झाला. आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर काळी शाई फेकली. याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगेसह काही महिलांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. शेडगे यांच्या प्रभागातील दापोडी परिसरात पालिकेकडून खोदकाम सुरू आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नगरसेविका शेडगे महिलांना घेऊन आयुक्त कार्यालयासमोर पोहचल्या. यावेळी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा त्यांचा हेतू होता, पण ती शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. मग या महिलांनी आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर शाई फेकली. त्यामुळे पालिका इमारतीत गोंधळ उडाला. मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी भाजा नगरसेविका शेडगे सह काही महिलांना ताब्यात घेतलं.

 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram