
Chandralal Meshram : आयोगाचा अहवाल न वाचताच सदस्यांच्या सह्या घेतल्या - चंद्रलाल मेश्राम
Continues below advertisement
Chandralal Meshram : आयोगाचा अहवाल न वाचताच सदस्यांच्या सह्या घेतल्या - चंद्रलाल मेश्राम राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांचा अहवाल सरकारला सादर करण्यापूर्वी कोणत्याही सदस्याला वाचायला न देता त्यावर सह्या घेतल्या असा गंभीर आरोप चंद्रलाल मेश्राम यांनी केलाय. या सर्वेक्षणाचा अहवाल आणि त्याआधारे दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं ते म्हणाले. आपल्याला कोणतंही कारण न देता आयोगातून वगळण्यात आलं असा आरोप त्यांनी केलाय. आयोगाचे आधीचे अध्यक्ष आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांवर सरकारचा दबाव होता असा आरोप त्यांनी केला. आनंद निरगुडेंच्या राजीनाम्याची तारीखही संशयास्पद होती असा आरोप त्यांनी केलाय.
Continues below advertisement